कोल्हापूर : अवैध गर्भपाताच्या आणि गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश सामोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर मधील क्रांतीसिंह नाना पाटीलनगर इथं एका घरात गर्भलिंग निदान केंद्र सुरू होते. याठिकाणी छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर या मधील मुख्य सूत्रधार असलेला बोगस डॉक्टर हा फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.
याच बरोबर सोशल मीडियावरून गर्भातील अर्भकाचे लिंग बदलून मुलगा होण्याचं औषध देण्यात येत असल्याचा दावा हा केला जात होता. या नंतर पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती मिळाली होती. ह्या वरून कोल्हापूर मधील बांबवडे येथे असणाऱ्या आनंद हॉस्पिटल मधील मनोज नाईक यांच्यावर पीसीपीएनडीटी ने छापा टाकला. पोलीस प्रशासन, सिव्हिल सर्जन यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने ही संयुक्त कारवाई केली. गर्भपात केल्यानंतर हे भ्रूण मेडिकल वेस्ट मध्ये टाकले जायचे. हा धक्का दायक प्रकार देखील ह्या स्टिंग ऑपरेशन मधून उघडकीस आला आहे.
मुलगा व्हावां आसे वाटत असेल तर गर्भधारणेनंतर पहिल्या दोन महिन्यांमध्ये नारळ पाण्या च्या माध्यमातुन गोळ्या खाव्यात. त्याच बरोबर ज्या म्हशीला रेडा झाला आसेल अश्या म्हशीचं दूध-दही-ताक, खाव अस सांगण्यात येत होत. ह्याचं बरोबर खाण्यामध्ये पुल्लिंगी पदार्थ खावेत. स्त्रिलिंगी पदार्थ खाऊ नये अशी पथ्ये गर्भातील अर्भकाचे लिंग बदला साठी सांगितली जात होती.