राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच ठेवणार

Update: 2021-11-15 05:13 GMT

परभणी // पाथरी आगाराच्या राज्य परिवहन मंडळाच्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यावर खचून न जाता संप सुरूच ठेवणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. पाथरी आगारातील पाच कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाहक-चालक व यांत्रिकी विभागातील एकूण पाच कर्मचाऱ्यांवर 9 नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली. चालक नागनाथ जाधव, चालक राजकुमार खजे, वाहक ए. राठोड, वाहक गिरीधर वाघमारे वाहक विजय सूर्यवंशी, यांत्रिकी प्रवीण सुखदेवे, राज्य परिवहन महामंडळाच्या पाथरी आगारातील अशा एकूण पाच कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली. संपादरम्यान सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे याबाबत वरिष्ठांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

पाथरी आगारातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे पाथरी आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज सांगितले. आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आगार परिसरात बसून आंदोलन सुरू केले आहे.

Tags:    

Similar News