मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांना राज्यस्तरीय 'महारत्न' पुरस्कार जाहीर

सांगलीच्या वांगी येथील राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान व पुण्यश्लोक अहिल्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय 'महारत्न' पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर व 'मॅक्स महाराष्ट्र'चे पत्रकार सागर गोतपागर यांची निवड करण्यात आली आहे.;

Update: 2022-01-04 03:46 GMT

सांगली// सांगलीच्या वांगी येथील राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान व पुण्यश्लोक अहिल्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय 'महारत्न' पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर व 'मॅक्स महाराष्ट्र'चे पत्रकार सागर गोतपागर यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीदिनी येत्या ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता वांगी येथे देण्यात येणार आहेत.

हा पुरस्कार वितरण सोहळा राज्य मंत्री डॉ विश्वजीत कदम, माजी खासदार राजू शेट्टी, दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, आमदार मोहनराव कदम दादा, वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे, युवा नेते जितेश कदम, सरपंच डॉ विजय होनमाने या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या सागर गोतपागर यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाज कार्य विषयात पदव्युत्तर उच्च शिक्षण घेत आयुष्यातील तीन वर्षे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या सर्च या संस्थेच्या माध्यमातून शेकडो आदिवासी गावांमध्ये दारूबंदी केली.


 



वंचित उपेक्षित समूहाच्या प्रश्नाला मुख्य माध्यमातून स्थान मिळत नाही हे पाहून त्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र' या आघाडीच्या माध्यमात वंचित समूहाच्या प्रश्नासाठी पत्रकारिता सुरू केली. महाराष्ट्रातील दुर्गम खेडी आदिवासी वंचित समूह यांचे अनेक प्रश्न मांडले. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक समस्या माध्यमाच्या मुख्य पटलावर आणल्या. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळवून दिला. आपल्या सडेतोड पत्रकारितेने त्यांनी भ्रष्टाचार उघडकीस आणला. साहित्य, पत्रकारिता आणि समाजकार्य या क्षेत्रात त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

या पुरस्कार कार्यक्रमाची घोषणा आयोजन समितीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ तांदळे यांनी केली. यावेळी जि.प शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कैलास कटरे, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अनिल बोडरे, सचिन मदने, सचिन बोडरे उपस्थित होते.

Tags:    

Similar News