लसीकरण मोहीम सुरू करून शाळा सुरू करा; पालकांची मागणी
शाळा सुरू करायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण नसेल तर शाळेत पाठवणे धोकादायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण होणं गरजेचं असल्याचं मत बीड मधील पालकांनी व्यक्त केलं आहे.;
राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. त्यामुळे पालकांच्या मनात मात्र विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरू करायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण नसेल तर शाळेत पाठवणे धोकादायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण होणं गरजेचं असल्याचं मत बीड मधील पालकांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना स्थितीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहेत. अशातच कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात यावी. अशी मागणी आता पालकांमधून होऊ लागली आहे.
दिवाळी नंतर शाळा सुरु करावी असे संकेत दिल्यानंतर पालकांनी मात्र विद्यार्थ्यांचा लसीकरण करून या निर्णयाची अंमलबजावणी करावी असं म्हटलं आहे. राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी तयार असले तरी, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अजून कोणतही पावले उचलले नसल्याने, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? असा प्रश्न देखील पालकांसमोर निर्माण झाला आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अथवा शाळेतच लसीकरण मोहीम राबवून शाळा सुरू करावी, अशी मागणी आता पालकांकडून केली जात आहे.