...अखेर अक्षय कुमारने मागितली माफी
बॉलीवूड (bollywood)अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar)हा काही दिवसांपासून एका जहिरातीमुळे चर्चेत आला आहे. दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. आता त्या जहिरातीवरुन अक्षयने माफी मागितली आहे.;
अक्षय कुमारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विमल पान(Vimal paan masala) मसालाच्या नवीन जाहिरातीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उत्तर दिले आहे. यात अक्षयने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच यापुढे कोणत्याही तंबाखू ब्रँडची जाहिरात करणार नाही, असेही त्याने सांगितले आहे.
मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.
विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आणि तुमच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो. म्हणूनच मी मोठ्या विनम्रपणे यातून माघार घेत आहे. तसेच मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मला मिळालेल्या पैशाचा मी चांगल्या कामासाठी वापर करेन.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
तसेच विमल पान मसाला या ब्रँडने जोपर्यंत या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही जाहिरात प्रसारित करु शकते. पण मी वचन देतो की यापुढे भविष्यात मी फार हुशारीने पर्यायाची निवड करेन. तसेच तुम्ही नेहमी माझ्यावर असेच प्रेम आणि प्रार्थना करत राहा, असे अक्षय कुमार म्हणाला.