एसटी चालकाच्या एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग, प्रवाशांचा जीव धोक्यात
गडचिरोली - महाराष्ट्रातील परिवहन महामंडळाच्या काही एसटी बस या पावसाळ्यात गळत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरलं झाले आहेत. अनेक जिल्ह्यातील नागरिक एसटी प्रवासाच्या अनुभवासंदर्भात बोलतं असतात समाजमाध्यमांवरुन तक्रारीही करत असतात. पावसाळ्यात अनेकदा एसटी बसमध्ये बिघाड होतात. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झालेल आपण पाहिले देखील असाल. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झालाय. एसटीची बस गळत असल्यामुळे एसटी चालकाने पाऊस सुरु झाल्यानंतर अंगावर पाणी पडू नये म्हणून एका हातात छत्री, दुसऱ्या हातात स्टेअरिंग पकडत एसटी बस चालवत असल्याने प्रवाशांच्या जीव धोक्यात आल्याचं दिसत आहे. त्यामुळे एसटीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आल्याने गतिमान सरकारवर नागरिकांकडून जोरदार टीका केली जात आहे.