कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचं शस्त्र म्हणून लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. सध्या देशात लसींचा मोठा तुटवडा आहे. त्यातच आता रशियाची स्पुतनिक लस भारतात येणार आहे. त्यामुळं देशातील अनेक लोकांना आता लस मिळण्याची आशा पल्लवित झाली असताना ही लस ही वॅक्सीन सर्वात प्रथम खाजगी क्षेत्राला मिळणार आहे. असे वृत्त आजतक वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
देशात करोना विषाणू विरोधात सुरु असलेल्या लढाईत स्पुतनिक वॅक्सीनचा वापर सुरु होणार आहे. स्पुतनिक वी वॅक्सीन पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे कोविड वर्किंग ग्रुप चे अध्यक्ष एन के अरोडा यांनी आजतक वृत्त संस्थेशी बातचीत करताना ही माहिती दिली.
स्पुतनिक वी वॅक्सीन देशात पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. त्यांच्यामते स्पुतनिक वी वॅक्सीन सर्वात आधी खासगी क्षेत्राला दिली पाहिजे. कारण वॅक्सीनच्या वायल ला एका विशिष्ट तापमानात ठेवणं गरजेचं आहे. तसेच पुढच्या तीन महिन्यात देशाला ३ पटीने अधिक वॅक्सीन मिळणार आहे. कोविशील्ड वॅक्सीनचे दोन डोस ज्यांनी घेतले आहे त्यांना काळजी करण्यासारखं काही नाही असं अरोडा यांनी आजतक वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
पुढे घरो-घरी लसीकरणासंदर्भात अरोडा सांगतात की, घरो-घरी लसीकरण ही संकल्पना शक्य नाही. कारण लसीकरणानंतर रिएक्शन होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे लसीकरणानंतर ज्यांना पण रिएक्शन झाल्यास तात्काळ त्यांना मेडिकल मदतीची गरज असते. त्यामुळे घरो-घरी लसीकरण शक्य नाही. तसेच सप्टेंबरपर्यंत फाइजर, मॉडर्ना, जॉनसन अँड जॉनसन च्या लशी उपलब्ध होणार आहे. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात ते सांगतात की, सप्टेंबर पर्यंत भारत बायोटेक च्या ट्रायलचा निकाल उपलब्ध होईल. त्यानंतर वर्षाखेरीज लहान मुलांना लसीकरण सुरु होईल.
लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं? देशात करोना महामारीला रोखण्यासाठी मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत 18 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाने संयुक्त पत्रकार परिषद घेत देशातील लसीकरणा संदर्भात माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपर्यंत देशात 200 कोटी लशींचे डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. देशात रशियाच्या स्पुतनिक लसीला परवानगी देण्यात आलेली आहे. ही लस भारतात दाखल झाली असून पुढच्या आठवड्यात ती बाजारपेठेत उपलब्ध होईल. तसेच ऑक्टोबर पासून रशियातील कंपनी भारतात स्पुतनिक लसीचे (Sputnik V) उत्पादन सुरु करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर देशात डिसेंबर पर्यंत 8 कंपन्यांच्या सुमारे 216 कोटी लशी उपलब्ध होतील. असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.