वंदे भारत एक्सप्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद- ए.के.सिंग

महाराष्ट्रातून धावणाऱ्या चारही वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशाचा तुफान प्रतिसाद मिळत असून मुंबई ते साईनगर शिर्डी एक्सप्रेससाठी वेटिंग लिस्टचे बुकिंग देखील फुल्ल असल्याची माहिती रेल्वेचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी कल्याण येथे दिली.

Update: 2023-02-18 15:05 GMT

महाराष्ट्रातून (Maharashtra) जवळपास चार वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावतात. मात्र मुंबई (mumbai) ते साईनगर शिर्डी (Sainagar Shirdi) एक्सप्रेससाठी कल्याण येथे थांबा मिळावा, अशी मागणी प्रवाशाकडून केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते जलद प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली असून या गाडीला पहिल्या दिवसापासूनच प्रवाशाच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (csmt) शिर्डीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला सीएसटी, दादर (Dadar), ठाणे (Thane) आणि नाशिक रोड (Nashik Road) असे चार थांबे देण्यात आले असून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटणारी हि गाडी ११ वाजून ४० मिनिटांनी शिर्डीत पोचत असल्याने भक्तांना दिवसभरात शिर्डी दर्शन करून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी निघणाऱ्या एक्स्प्रेसने रात्री ११ वाजता मुंबईत परतता येत असल्याने ही एक्स्प्रेस प्रवाशासाठी पर्वणी ठरली आहे. यामुळेच मुंबई ते शिर्डी गाडीला पहिल्या दिवसापासून प्रवाशाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सुट्टीच्या दिवसाचे बुकिंग वेटिंग लिस्टपर्यत जात असून इतर तिन्ही गाड्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे सांगितले आहे. कल्याण हे जंक्शन असून या स्थानकातून दररोज ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात. कल्याण आणि त्यापुढील प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करायचा झाल्यास त्यांना ठाणे किंवा दादर गाठावे लागत असून यात प्रवाशांना खूप वेळ प्रवास करावा लागत असल्याची प्रवाशाची तक्रार आहे यामुळेच या एक्स्प्रेसला कल्याण (kalyan) थांबा दिला जावा अशी प्रवाशाची मागणी आहे.

Tags:    

Similar News