सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बुलडाण्यात ठिणगी

Update: 2021-10-22 11:41 GMT

31 ऑक्टोबरला बुलडाण्यात एल्गार मोर्चा तर विदर्भ - मराठवाडा - खान्देशात मोठ्या स्वरूपात आंदोलन पेटवू असा इशारा आज बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला , तुपकर यांच्या नेतृत्वात आज शेतकऱ्यांनी अचानक एकत्र येत सडलेले सोयाबीन जाळून आंदोलन केले.त्यावेळी ते बोलत होते.

सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अतिशय तोकडी असून अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रु.मदत देण्यात यावी, सोयाबीनचा प्रति क्विंटल दर 8 हजार रुपये, तर कापसाचा प्रति क्विंटल दर 12 हजार रुपये स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, ओला दुष्काळ जाहीर करावा, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

तसेच या मागण्यांसाठी 31ऑक्टोबरला बुलडाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ - मराठवाडा - खान्देशात मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली. सोयाबीन जाळून बुलडाण्याच्या सोयाबीन-कापसाच्या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन-कापूस उत्पादकांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

Tags:    

Similar News