मोदी सरकार आणि काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस टोतकाला पोहोचतो आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi) यांना EDने दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. मंगळवारी दुपारी सोनिया गांधी EDच्या कार्यालयात दाखल झाल्या. दोन तासांपेक्षा जास्त वेळ त्यांची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, महागाई या मुद्द्यांवरुन आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनिया गांधी यांच्या ED चौकशीविरोधात देभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मुंबईतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. "देश के 'राजा' का हुक्म है - जो बेरोज़गारी, महंगाई, गलत GST, अग्निपथ पर सवाल पूछेगा - उसे कारागृह में डाल दो। भले ही मैं अभी हिरासत में हूं, भले ही देश में अब जनता की आवाज़ उठाना जुर्म हो, लेकिन वो हमारा हौसला कभी नहीं तोड़ पाएंगे।"
तानाशाही देखिए, शांतिपूर्ण प्रदर्शन नहीं कर सकते, महंगाई और बेरोज़गारी पर चर्चा नहीं कर सकते।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 26, 2022
पुलिस और एजेंसियों का दुरूपयोग करके, हमें गिरफ़्तार करके भी, कभी चुप नहीं करा पाओगे।
'सत्य' ही इस तानाशाही का अंत करेगा। pic.twitter.com/M0kUXcwH8L
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ED चौकशी सुरू आहे. याआधी सोनिया गांधी यांना ईडीने एकदा बोलावून तब्बल ३ तास चौकशी केली होती. त्यांना आता दुसऱ्यांदा बोलावण्यात आले आहे. राहुल गांधी यांची देखील काही दिवसांपूर्वी सलग काही दिवस ईडीने चौकशी केली आहे. मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसह विरोधकांनी वारंवार केला आहे. तसेच याविरोधात संसदेत देखील अनेकवेळा आरोप करण्यात आला आहे.