कोरोना ज्या प्रयोगशाळेतुन आला त्याचा मालक बिल गेट्स- मेधा पाटकर

वुहानमधील ज्या प्रयोगशाळेतून कोरोना पसरला ती प्रयोगशाळा बील गेट्स यांच्या मालकीची आहे, असे मेधा पाटकर यांनी म्हटले.;

Update: 2022-02-23 03:20 GMT

जगात दोन वर्षांपासुन कोरोनाचा कहर सुरु आहे.चीनमधल्या वुहानमध्ये या कोरोना विषाणूचा उगम झाल्याचे कळत आहे.सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी याविषयी एक देवा केला होता.कोरोना ज्या प्रयोगशाळेतुन आला त्या वुहानमधल्या प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स असल्याचे विधान केले आहे.

कोरोना ज्या लॅबमधुन निघाला त्या लॅबचा मालक बिल गेट्स आहे.बिल गेट्स फाऊंडेशनने पूर्ण जगाच्या शेतीवर कब्जा करण्याचं ठरवलं आहे.स्वत अमिरिकेतल्या दोन लाख ४० हजार एकराचा मालक असुन सुद्धा आणि त्यांना आता केंद्रातले कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनालासुद्धा दाद न दिल्यामुळे ७१५ शेतकरी शहीद झाले आहेत. त्या तोमरांनी गेट्स यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तेव्हा हे कॉर्पोरेटायझेशन याला जबाबदार आहे. असं ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्यांच्या उल्लंघनाबाबत मेधा पाटकर यांनी सहायक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेतली. त्यांना विविध मागण्यांचं निवेदनही दिलं. त्यानंतर पाटकर माध्यमांशी बोलत होत्या.

कामगारांच्या प्रश्नाविषयी बोलताना पाटकर यांनी सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, केंद्राची सर्वात महत्वाची भूमिका ही आहे की, केंद्र सरकार महाराष्ट्र,पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांना ८० ते ९० हजार कोटी रुपये देणं देत नाही. पण ज्यावेळी कामगारांसाठी काही करण्याची वेळ येते, तेव्हा केंद्र सरकार राज्यावर जबाबदारी टाकतात, की तुम्ही त्यांची जबाबदारी घ्या, त्यामुळे जे काही सध्या चाललं आहे हे संविधान विरोधी आहे. या सर्वासाठी संघर्षांशिवाय गत्यंतरच नाही. 

Tags:    

Similar News