संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात...

टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर गायब असलेले वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे प्रकटल्यानंतर आता संजय राठोड यांच्या विरोधात अंनिस, जात पंचायत, बंजारा क्रांती दल आणि मूठमाती अभियान या संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Update: 2021-02-25 04:11 GMT
संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात...
  • whatsapp icon

समाजाची ढाल पुढे करून जातपंचायत सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप अंनिसने केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये जातपंचायत हस्तक्षेप करत असून हा हस्तक्षेप मुख्यमंत्र्यांनी तातडीने थांबवावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणाचा वनमंत्री संजय राठोड यांनी या पद्धतीप्रमाणे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रकरण पूर्णतः चुकीच्या पद्धतीप्रमाणे केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तातडीने राठोड यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आजच्या परिस्थितीला या सर्व प्रकरणाला जातपंचायतीचा रंग दिला जात आहे आणि त्या माध्यमातून बंजारा समाजासमोर राठोड हे आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याचा खटाटोप करीत आहेत. त्यामुळे तातडीने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि राठोड यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी अंनिसने केली आहे.ज्या पद्धतीप्रमाणे पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन करून राठोड यांनी बंजारा समाजासमोर निर्दोष असल्याचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पोहरादेवी हे पीठ नाही तर ते शक्तीपीठ आहे.

हे वनमंत्री राठोड यांनी लक्षात ठेवून त्या पद्धतीप्रमाणे समाजात आपले निर्दोषत्व सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, बंजारा समाजामध्ये जातपंचायतीला नाईक असे म्हटले जाते आणि या पद्धतीप्रमाणे नाईक यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन केले ते चुकीचे आहे. यामुळे शासनाने आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.


सदर प्रकरणात संशयित म्हणून वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात आहे. सलग काही दिवस गायब झालेल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले नामदार संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे श्रद्धा स्थान असलेल्या पोहरादेवी येथे पत्रकार परिषद घेतली. बंजारा समाजातील आवाहनावर जात बांधव कोविड संसर्ग विषयक प्रतिबंधाचे सर्व नियम तोडून तिथे उपस्थित होते. पत्रकार परिषद इतरत्र न घेता पोहरादेवी महंतांच्या जागेत घेणे हे समाज बांधवाची साथ व त्यांची मते आपल्या बाजुने रहावीत यासाठी घेतल्याचे दिसते. खरे तर पोहरादेवी हे समाजाचे 'श्रद्धा स्थान' असु शकते, पण ते समाजाचे 'न्याय स्थान' मानणे संवैधानिक व्यवस्थेत चुकीचे आहे.

आपली 'श्रद्धा स्थाने' ही समाजाची 'सत्ता केंद्र' म्हणुन वापरणे संविधानाच्या अधिकारांचा अधिक्षेप आहे. समाजातील न्याय निवाडा करण्याचा त्यांना अधिकार नाही. महाराष्ट्र राज्यात जात पंचायतीच्या अत्याचार विरोधी 'सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा' आहे. त्यानुसार आता कुणालाही समांतर न्याय व्यवस्था चालविता येणार नाही. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार संजय राठोड यांनी व त्यांच्या समर्थनासाठी समाज बांधवांनी केलेले वर्तन जात आणि जात पंचायत व्यवस्था अधिक घट्ट करणारे आहे. त्याचा आम्ही महा अंनिस, जात पंचायत मूठमाती अभियान याचा निषेध करीत आहोत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. चव्हाण या बंजारा तरुणीच्या कथीत आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर संशय व्यक्त होत असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी.

बंजारा तरुणी पूजा चव्हाण यांच्या कथीत आत्महत्या प्रकरणी आपल्या सरकारमधील वनमंत्री मा. संजय राठोड यांच्याबाबत बंजारा व अन्य समाजात मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन सत्य समाजासमोर आणुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बंजारा क्रांती दलाचे देविदास राठोड मध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Tags:    

Similar News