पुण्यात शिवसैनिकांचा राडा, किरीट सोमय्यांवर हल्ला
भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच संजय राऊत यांच्या मित्रगटाचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा असे ट्वीट सोमय्या यांनी केले होते. तर भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सोमय्या पुणे शहरात दाखल झाले होते. त्यावेळी पुणे महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.;
महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या दररोज महाविकास आघाडीच्या नेत्यांवर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यापार्श्वभुमीवर किरीट सोमय्या यांनी शनिवारी सकाळी संजय राऊत यांच्या मित्राने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यासाठी पुणे शहरात गेले होते. दरम्यान पुणे महापालिकेच्या आवारात आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.
किरीट सोमय्यांनी शनिवारी सकाळी ट्वीट करून आरोप केला होता की, संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. तसेच जंबो कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तर त्यासंबंधी तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या पुणे शहरात गेले होते. दरम्यान पुणे महापालिका आवारात आपल्यावर शिवसेनेच्या गुंडांकडून हल्ला झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022
किरीट सोमय्यांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्यांवर हल्ला झाल्याबाबत हल्लेखोरांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. तर किरीट सोमय्यांवर हल्ला झाला असला तरी किरीट सोमय्या किंवा भाजप शांत बसणार नाही, असे मत व्यक्त केले.