तटकरेंच्या विरोधात शिवसेनेचा हक्कभंग

Update: 2020-10-24 08:02 GMT

महाविकास आघाडीत सगळं All is Well असल्याचं राज्यातील नेते सांगत असले तरी ग्राउंड लेव्हलला वेगळीच परिस्थिती आहे. आपल्या मतदारसंघातील विकास कामांच्या कार्यक्रमाला निमंत्रण न देता खासदार सुनील तटकरेंकडून परस्पर उद्घाटनं केली जात आहेत. कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नसल्याचा आरोप करत माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे.

२० ऑक्टोबर ला आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोकणात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे.

Tags:    

Similar News