शिवसेनेचे 'यशवंत' अडकले?, 41 संपत्ती जप्त

राज्यात भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना नेते यशवंत जाधव यांची आयकर विभागाने संपत्ती जप्त केल्याची घटना घडली आहे.;

Update: 2022-04-08 05:00 GMT

केंद्रीय तपास यंत्रणांनी (Centrral Agency) राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात कारवाईचा फास आवळायला सुरूवात केली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आयकर विभागाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. (Central Agency target to mahavikas Aghadi leader)

शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले यशवंत जाधव यांच्या आणखी 41 संपत्ती आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. या कारवाईमध्ये यशवंत जाधव यांच्या बांद्रा येथील पाच कोटींच्या फ्लॅटचा सामावेश आहे. ( Income Tax raid on Yashwant Jadhav)

काय आहे प्रकरण?

यशवंत जाधव 2018 ते 2022 दरम्यान मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी बेकायदेशीर मालमत्ता गोळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आयकर विभागाने या तक्रारीची दखल घेत माझगाव येथील यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी पहाटेच छापा टाकला होता. या छाप्यानंतर सुरू झालेल्या कारवाईत यशवंत जाधव यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात झाली. (Why IT Raid on Yashwant Jadhav Home)

आतापर्यंतची कारवाई-

महाविकास आघाडीचे मंत्री असलेले नवाब मलिक यांच्याप्रमाणेच आयकर विभागाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पहाटेच छापा टाकला. त्यानंतर या कारवाईला वेग येत आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या. तसेच कोरोना काळात यशवंत जाधव यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा आयकर विभागाला संशय होता. त्यानुसार आयकर विभागाने कारवाई केली आहे. तर यापुर्वी मातोश्रीला कोट्यावधी रुपयांचे दोन घड्याळ देण्यात आल्याची माहिती यशवंत जाधव यांच्या डायरीत आढळून आली होती. त्यानंतर आता यशवंत जाधव यांचा 5 कोटी रुपयांचा बांद्रा येथील फ्लॅट आणि 40 विविध ठिकाणच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत आले आहेत. (Income tax seized property of Yashwant Jadhav)

Tags:    

Similar News