शिवजयंती उत्सव: अमिताभ बच्चन यांचं मराठीतून ट्विट
अमिताभ बच्चन चं मराठीतून ट्विट...
आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्या निमित्ताने कला, साहित्य, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील खास मराठीतून जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत...
T 3817 - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
गेल्या वर्षी देखील त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शब्द नाहीत तर मंत्र आहे. अनेक शतकांनंतरही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वोत्तम लढवय्ये आणि आदर्श राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांना शत शत नमन.'
असं गेल्या वर्षीच्या ट्विट मध्ये म्हटलं होतं.
मात्र, ते हिंदी मध्ये होतं. यंदाची पोस्ट मराठी मधून करण्यात आली आहे. दरम्यान पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर न बोलणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार चे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. असा इशारा कॉंग्रेसने दिल्यानंतर बच्चन यांनी आज मराठीत केलेल्या ट्विटला महत्त्व प्राप्त झालं आहे.