महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीत ग्राउंड झिरोवर वाद झाल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे हे वाद स्थानिक लेव्हलला मिटवण्यात दोनही पक्षाला यश आलेलं नाही. आपल्या मतदारसंघातील विकास कामांच्या कार्यक्रमाला निमंत्रण न देता खासदार सुनील तटकरेंकडून परस्पर उद्घाटनं केली जात आहेत. कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नसल्याचा आरोप करत माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
२० ऑक्टोबर ला आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. यावर खासदार सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये समज गैरसमज पसरू नयेत. म्हणून माझ्या विरोधात दाखल झालेल्या हक्कभंग स्विकृत करावा. अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली जाणार असल्याची माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी दिलीय. घटनेनुसार खासदार म्हणून मला बैठक बोलावता येते की नाही. हे ही तपासावे. आणितातडीने मला नोटिस काढावी आणि त्याचे मी उत्तर देखिल देणार नाही. असं सांगत माझ्यावर हक्कभंगाची कारवाई होणार असेल तर ती करावी.
मात्र, महाविकास आघाडीचं सरकार टिकावं म्हणून माझ्यावर कारवाई करावीसाठी मी सामोरं जाईन अशी स्पष्ट भूमिका खासदार सुनिल तटकरेंनी मांडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोकणात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे.