हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९४ वी जयंती आहे. संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्यावर शिवजयंती सोहळ्याचा आनंद आणि उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.
शिवजयंती सोहळ्याचा उत्सव शिवनेरी गडावर पार पडत असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या शिवभक्तांनी शिवनेरी गडावर गर्दी केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुध्दा शिवजन्मोत्सवात सहभागी होणार आहेत.
हा शिवजन्मोत्सव सोहळा पारंपारीक पध्दतीने पार पडणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेत इतर मंत्री सुध्दा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी सोहळ्यानिमित्त गडावर सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा आयुक्त कुलकुलवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सहास दिवसे यांच्या उपस्थितीत झाली.
शिवनेरी गडावर शिवाई देवराई आणि वनउद्योगाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार असून गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांसाठी मोटर सायकल आणि चारचाकी गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात पार्कींग परिसर वाढवण्यात आला आहे.