Shinzo Abe शिंजो आबे यांचे निधन

कोण होते शिंजो आबे? भारत आणि त्यांचे संबंध कसे होते? वाचा शिंजो आबे यांच्या राजकीय जीवनप्रवासाबाबत;

Update: 2022-07-08 09:48 GMT

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं जपानमध्ये निधन झालं. Shinzo Abe यांच्यावर भाषण देत असताना गोळीबार करण्यात आला होता.

पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण देत असताना जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडल्या होत्या. Shinzo Abe former Japanese prime minister dies after being shot during election campaign

शिंजो एबे हे शुक्रवारी पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण देत होते. यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. त्यामुळे शिंजो आबे जागेवरच कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांमधून आली होती. शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडण्यात आल्यानंतर ते जागेवरच कोसळले. त्यांचा रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कोण आहेत शिंजो आबे? who is Shinzo Abe

शिंजो आबे हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. त्यांनी 1993 ते 2006 या काळात हाऊस ऑफ रिप्रेंझेटेटिव्ह चे सदस्यत्व पद भुषवले. तर पुढे लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि 2006 ते 007 या काळात जपानचे पंतप्रधानपद भुषवले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांना पुन्हा बहुमत मिळाले.

त्यावेळी शिंजो आबे जपानचे पंतप्रधान बनले. तर त्यानंतर सलग 8 वर्षे पंतप्रधान पद भुषवणारे ते जपानमधील पहिले व्यक्ती होते. मात्र 2020 मध्ये त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. त्यानंतर जपानच्या पंतप्रधानपदी योशिहिदा सुगा यांची निवड करण्यात आली.

भारत सरकारने 2021 मध्ये शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

भारत आणि शिंजो आबे संबंध…

मृत्यू समयी शिंजो आबे यांचे वय 67 वर्षांचे होते.

शिंजो आबे हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. जपानचे सध्याचे पंतप्रधानही लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत

शिन्झो आबे हे QUAD चे मुख्य शिल्पकार मानले जातात.

भारताकडून त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

2007, 2014, 2015 आणि 2017 मध्ये भारताचा दौरा केला होता. आबे यांनी 2007 मध्ये भारतीय संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले होते.

2014 मध्ये ते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.

4 वेळा जपानचे पंतप्रधान राहिले आहेत.

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते.

Tags:    

Similar News