शरद पवार यांचे जयंत पाटील यांच्याबाबत महत्त्वाचे विधान

Update: 2024-10-17 04:21 GMT

“महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल, ज्यात तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील आणि निर्णय घेतला जाईल,” असे शरद पवार कराड येथे बोलताना म्हणाले. पत्रकारांनी न्याय देवतेच्या मुर्तीमधील बदलांबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, “या बदलाने देशाला नवीन दिशा मिळाली आहे, जो विचार पूर्वी झाला नव्हता.”

मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीबद्दल बोलत आहेत, ज्यामुळे त्यांना लोकसभेसाठी मोठा फटका बसला आहे. यावर शरद पवार म्हणाले, “निर्णय होऊ द्या, त्यानंतर बोलता येईल.”

शरद पवार यांनी यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल मोठं विधान केलं. विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत” कालच शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं होतं.

हरियाणाच्या निकालावर शरद पवार काय म्हणाले?

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत काही नेते दावा करत आहेत. मविआत शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह आहे, त्यावर शरद पवार बोलले की, “आमच्या तिघांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हा विषय संपला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील” हरियाणातील पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नितीमध्ये काही बदल होणार का? “हरियाणात त्यांचं सरकार आहे, ते कायम झालं. यापेक्षा दुसरं काही नाही. हरियाणाच्या निकालाचा आम्ही अभ्यास करतोय. जम्मू-काश्मीर सारख्या निवडणुकीवर जगाच लक्ष असतं. त्या पार्श्वभूमीवर तो निकाल देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे”

Tags:    

Similar News