राष्ट्रवादीत खांदेपालट, अजितदादांचं काय?

Update: 2023-06-10 08:49 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनाला पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षसंघटनेत मोठे बदल केले आहेत. दरम्यान, हे बदल करतांना अजित पवार यांना पक्षसंघटनेतील निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलंय. विशेष म्हणजे नव्या जबाबदारीचं वाटप करतांना अजित पवार यांच्यावर कुठलीही जबाबदारी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवारांचं स्थान काय, अशी चर्चा आता सुरू झालीय.

शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीची सूत्रं कुणाच्या हाती जातील, याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. त्या राजीनाम्याच्या घटनेनंतर सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यापैकी एकाकडे पक्षाची सूत्रं जातील, असा कयास लावला जात होता. मात्र, राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी दोन कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. त्यात पहिलं नाव होतं ते प्रफुल्ल पटेल यांचं तर दुसरं नाव होतं खासदार सुप्रिया सुळे यांचं. त्यामुळं अजित पवार यांना पक्षसंघटनेतील नव्या बदलात स्थान काय, अशी चर्चा आता सुरू झालीय.

राष्ट्रवादीतील नवे बदल, नव्या जबाबदाऱ्या

प्रफुल्ल पटेल (Praful patel) – मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी

सुप्रिया सुळे(supriya sule)  – महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी

सुनील तटकरे (sunil Tatkare)– ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग या जबाबदाऱ्या

डॉ. योगानंद शास्त्री (Yoganadar shastri)- दिल्ली सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

के. के. शर्मा (K.k. sharma) – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग

फैजल (Faijal)– तामिळनाडू, तेलंगणा, केरळ

नरेंद्र वानवा (narendra vanva) – सर्व पूर्वेकडची राज्ये, आयटी विभाग

जितेंद्र आव्हाड (jitendra Ahwad)– बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग

नसीम सिद्दिकी (nasim siddiki) – उत्तर प्रदेश, बिहार, गोवा

Tags:    

Similar News