#ravepary- शाहरुखचा मुलगा आर्यनसह तिघांना एका दिवसाची NCB कोठडी

Update: 2021-10-03 15:15 GMT

मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रुझमध्ये (Cruise)सुरू असलेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी (rave party) अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) याच्यासह तिघांना NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांना अटक केल्या किला कोर्टात हजर करण्यात आले. यानंतर तिघांना एक दिवसाची NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. क्रुझवर NCBच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीमध्ये काही प्रमाणात ड्रग्जही(drugs) सापडले आहे. यामध्ये कोकेन, मेफाड्रीन या ड्रग्जचा समावेश आहे. शनिवारी क्रुझमधील रेव्ह पार्टीवर NCBने छापा टाकला होता.

NCBने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार या क्रुझवरुन 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम मेफेड्रोन, 21 ग्रॅम चरस आणि 22 ग्रॅम एमडीएमए तसेच 1 लाख 33 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. 8 जणांना ताब्यात घेतले आहे, त्यापैकी काहींना आता कोर्टात हजर केले आहे तर काहींना एक ते दोन दिवसात हजर केले जाईल, असेही NCB तर्फे सांगण्यात आले. तसेच 8 जणांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीप्रमाणे ड्रग्ज पुरवणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. आता व्यवहार कसा झाला याची माहिती मिळवण्यासाठी या लोकांना एकमेकांसमोर उभे करुन चौकशी करायची असल्याचे NCB तर्फे सांगण्यात आले. ताब्यात घेतलेल्यांच्या मोबाईलमधील वॉट्सअप संभाषणावरुन अमली पदार्थांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचे NCBने सांगितले आहे. एनसीबीने दोन दिवसांची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने एका दिवसाची कोठडी मंजूर केली आहे.


आर्यन खानने कोर्टात काय माहिती दिली?

एड. सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खान याची कोर्टात बाजू मांडली. आर्यन खान याला त्या ठिकाणी बोलावण्यात आले होते. त्याच्याकडे बोर्डिंग पास नव्हता, तसेच त्याने कोणत्याही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. तसेच त्याच्या मोबाईल चॅटमधूनही अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण NCBला नव्याने चौकशी करायची आहे त्यामुळे एका दिवसाच्या कोठडीची आमची तयारी असल्याचे मानेशिंदे यांनी सांगितले. चौकशी दरम्यान NCBने आर्यन खानला कोणतीही जबरदस्ती केली नसल्याचेही मानेशिंदे यांनी सांगितले. जामिनासाठी अर्ज केला तरी NCB एक दिवसाची मुदत मागेल, त्यामुळे आपण जामिनासाठी सोमवारी अर्ज करणार असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले.

NCBने आर्यन खान,(Aryan Khan) अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकेर, गोमीत चोप्रा यांना अटक करण्यात आली आहे.


दरम्यान ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती त्या कॉर्डेलिया क्रुझ (cordelia cruises) कंपनीने या पार्टीशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे सांगितले आहे. दिल्लीमधील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने क्रुझ भाड्याने घेऊन पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे आम्ही NCBला चौकशीमध्ये सर्वतोपरी सहाय्य करत आहोत, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Tags:    

Similar News