अमेरिकेत शूटिंगदरम्यान शाहरुख खानचा अपघात
किंगखान फेम शाहरुख खानचा अमेरिकेत शूटिंग सुरू असताना अपघात झाला. लॉस एंजेलिसमध्ये एका अज्ञात प्रकल्पासाठी शूटिंग करत होता. त्याठीकाणी शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली असल्याचं समजतय त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली, असे एका अहवालात म्हटले आहे.;
“शाहरुख खान(SRK) लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता आणि त्याच्या नाकाला दुखापत झाली. त्याला रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले," असल्याचं एका वृत्तवाहीने सांगितले होतं.
"शाहरुख खान टीमला डॉक्टरांनी कळवले होते की, काळजी करण्यासारखे काही कारण नाही आणि शाहरुखला रक्तस्त्राव थांबवण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल. ऑपरेशननंतर, SRK त्याच्या नाकावर पट्टी बांधलेला दिसल्याचं काही सूत्रांनी सांगितले.
शाहरुख खानच्या अहवालात असेही म्हटले आहे की सुपरस्टार आता त्याच्या मुंबईतील घरी परतला आहे आणि तो बराही होत आहे.
गेल्या महिन्यात हिंदी चित्रपटसृष्टीत ३१ वर्षे पूर्ण करणाऱ्या या सुपरस्टारने सांगितले की, अनेक लोकांचे मनोरंजन करणे ही त्यांची "सर्वात अभिमानास्पद कामगिरी" आहे. नंतर, 2022 च्या निकेलोडियन किड्स चॉईस अवॉर्ड्स (KCA) मध्ये अॅक्शन ब्लॉकबस्टर "पठान" मधील भूमिकेसाठी त्याला 'आवडता चित्रपट अभिनेता' म्हणूनही नाव देण्यात आले.
त्याच्या अभिनयाच्या आघाडीवर बोलताना पठाणने शाहरुख खानचे जवळपास तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. ₹540 कोटींपेक्षा जास्त घरगुती बॉक्स ऑफिस कलेक्शनसह हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.
यावर्षी शाहरुख लवकरच 'जवान' आणि 'डंकी'मध्ये दिसणार आहे. अॅटली दिग्दर्शित, 'जवान' 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही भूमिका आहेत.