महाड तालुक्यातील ब्लू जेट कंपनीमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आग आगीमध्ये 7 कामगार जखमी तर 11 कामगार बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अकरा कामगारांपैकी सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह एनडीआरएफ च्या पथकाने बाहेर काढले आहेत. आणखी चार कामगारांचा शोध सुरू आहे. मृत कामगारांना एकूण 40-45 लाखाची मदत मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.