भंडारा जळीत प्रकरणाचे गोसेखुर्द होणार नाही हीच अपेक्षा: प्रकाश आंबेडकर
भंडाऱ्यातील १० नवजात बालकांच्या जळीतकांडावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी भंडारा जळीत प्रकरणाचे गोसेखुर्द होणार नाही असा टोला सरकारला लगावला आहे.;
भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील शिशु केयर सेंटर मध्ये गुदमरून १० नवजात बालकांचे मृत्यू झाले. या संबंधी राज्य सरकारने खबरदारी घेत तात्काळ मदत दिली. तर सदर प्रकरण बाबत राज्य सरकारने चौकशीचे आदेश देखील देण्यात आले असून, चौकशी सुरु झाली आहे. मात्र विरोधकांनी या घटने संबंध ने सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
तर गोसेखुर्द ची चौकशी ५ वर्ष होऊन सुद्धा पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे प्रकरण सुद्धा त्याच प्रमाणे प्रलंबित राहू नये असा सवाल वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अद्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्याच बरोबर सदर कक्षाचे नूतनीकरण तीन महिन्या आधी करण्यात आले आहे. हास्पिटल प्रमुख व बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली.