पत्रकार परिषदेपाठोपाठ संजय राऊत यांचा सूचक इशारा

शिवसेना भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.;

Update: 2022-02-16 03:49 GMT

राज्यातील जनतेची उत्सुकता वाढवणारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार शिवसेना भवन येथे पार पडली. त्यात भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. मात्र त्यानंतर भाजपच्या कोणत्या नेत्यांना तुरुंगात पाठविण्यात येणार याबाबत सूचक विधान केले आहे.

संजय राऊत यांच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन लोकांची नावे जाहीर करण्यात येणार होते. मात्र संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन नेत्यांचा उल्लेख टाळला. परंतू किरीट सोमय्या, नील सोमय्या, देवेंद्र फडणवीस, सुधीर मनगुंटीवार आणि मोहित कुंबोज यांच्यावर संजय राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केला. त्यापाठोपाठ संजय राऊत यांनी केलेल्या सूचक विधानावरून चर्चेला उधाण आले आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, बाप बेटे जेलमध्ये जाणार! वेट अँड वॉच, कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे, जय महाराष्ट्र, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पुरावे न देता आरोप केल्याने सोशल मीडियावर संमीश्र प्रतिक्रीया उमटत होत्या. मात्र आता संजय राऊत यांनी ट्वीट करत बाप बेटे जेलमध्ये जाणार असल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे हो रोख किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याकडे आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली होती. तर संजय राऊत यांचे मित्र सुजीत पाटकर यांनी बोगस कंत्राट मिळवून जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. तर मंगळवारी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे किरीट सोमय्यांकडून होणारे आरोप आणि त्याला संजय राऊत यांच्याकडून दिलेले प्रत्युत्तर यांमुळे भाजप शिवसेना वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags:    

Similar News