मी पुन्हा सागंतो 'बाप बेटे जेल जाएंगे', संजय राऊतांचा इशारा

शिवसेना भाजप संघर्ष सुरू असतानाच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपला इशारा दिला आहे.;

Update: 2022-03-02 03:24 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकार परिषद आणि ट्वीटरवर भाजप विरुध्द शिवसेना घमासान सुरू आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाप बेटे जेल जाएंगे, असं वक्तव्य करत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना इशारा दिला होता. तर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी सोमय्यांना इशारा दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून म्हटले आहे की, माझे शब्द लिहून ठेवा. मी पुन्हा सांगतो की, बाप बेटे जेल जाएंगे, काही कालावधीतच... आणि याचीही खात्री ठेवा की, बाप बेट्यासह तीन केंद्रीय यंत्रणांचे वसुली एजंट आणि अधिकारीही गजाआड जातील. महाराष्ट्र झुकेंगा नहीं..!

काय आहे प्रकरण :

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेतृत्वासह नेत्यांविरोधात पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा आरोप करून राळ उडवून दिली. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाप बेटे जेल जाएंगे म्हणत भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तर सोमय्या यांनी त्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते.

त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या हे पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे पार्टनर असल्याचा आरोप करत त्यासंबंधीचे पुरावे मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिले. त्यामुळे किरीट सोमय्यांचे टेन्शन वाढले होते. तर नील सोमय्यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तक्रारच दाखल नसल्याचे अटकपुर्व जामीन फेटाळण्यात आला. तर संजय राऊत यांच्या इशाऱ्यापाठोपाठ किरीट सोमय्या दिल्लीला गेले होते. 

Tags:    

Similar News