Mark My Word... बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊत यांचा पुन्हा इशारा

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना यापुर्वी इशारा दिला आहे. मात्र आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र आता किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.;

Update: 2022-04-07 03:31 GMT

राज्यात शिवसेना भाजप संघर्ष वाढत टीपेला गेला आहे. त्यातच किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैसे राजभवनला जमा न केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे.

राज्यात शिवसेना भाजप संघर्ष रंगला आहे. त्यातच संजय राऊत यांची संपत्ती ED ने जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर 2013 ते 2015 या कालावधीत INS विक्रांत ही युध्दनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी गोळा केला होता. मात्र हा निधी राजभवनकडे सुपुर्द करण्यात आला नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी 2013 ते 2015 या काळात INS विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला निधी निवडणूकीसाठी आणि स्वतःच्या व्यवसायासाठी वापरल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत मार्क माय वर्ड, INS विक्रांत च्या नावे 56 कोटी गोळा करून जनतेला आणि देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेट्याला जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपला जाब विचारावा लागेल, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत दिलेला इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्याची पुर्तता होण्याच्या दिशेने सुरूवात झाली असल्याचे दिसत असल्याने संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

Tags:    

Similar News