मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया...
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेलं असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटी पुर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ही भेट होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज ही भेट होत आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.