मुंबई पोलिस आयुक्त पदी आता संजय पांडे

Update: 2022-02-28 13:25 GMT

राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील.

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी मुंबईचे आयुक्त परमवीर सिंग यांची पदावरुन उचलबांगडी केली होती. सचिन वाझे प्रकरणानंतर पोलिस दलात काही फेरबदल करुन काही आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली.त्यावेळी हेमंत नगराळे यांना मुंबईचे सुत्र दिले होते.आता त्यांचीही बदली करण्यात आली आहे.

हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील. नगराळे यांच्यावर महाविकास आघाडीतील काही नेते नाराज होते त्यामुळं त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, संजय पांडे यांच्याकडं पोलीस महासंचालकपद देण्यात आलं त्यापूर्वी हेमंत नगराळेंकडं हे पद होतं. पण परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानं नगराळे यांच्याकडं मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे.महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत.संजय पांडे यांनी आपल्या महासंचालकपदाच्या हंगामी काळात पोलिस कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी कर्मचाऱ्यांत आपुलकीची भावना होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मनातील पोलिस आयुक्त मुंबईत आल्याची चर्चा खात्यात रंगली आहे.

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तेथे नगराळे यांना गेल्या वर्षी आणण्यात आले होते. त्यांना तेथे आपला कालावधी पूर्ण करता आला नाही.

Tags:    

Similar News