सांगली जिल्ह्यात गारपीटीचा तडाखा, शेतीचं नुकसान, संसारही उघड्यावर

Update: 2023-04-19 03:50 GMT

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडला आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड, मांजर्डे, हातनूर या भागात घराचे पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. त्याबरोबरच गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीला आलेली पीकं गारपीटीच्या तडाख्याने उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यातच मका, द्राक्षे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

अवकाळी पावसामुळे शेतातील उभी पीकं उध्वस्त झाले आहे. एवढंच नाही तर घराचे छतही उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे पंचनामे करून आम्हाला तातडीने नुकसान भरपाई द्या, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याला सरकारने प्रतिसाद देत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. 


 

Tags:    

Similar News