उद्धव ठाकरेंवर टीका करणारे संबीत पात्रा सोशल मीडियावर ट्रोल
मोदींनी देशाला इतक्या उंचीवर नेलं की ऑक्सीजन कमी पडला, उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या संबीत पात्राला नेटकऱ्यांनी घेरलं;
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. सोशल मीडियावर मोदींच्या नेतृत्वाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे.
भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला आता नेटिझन्स उत्तर देत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना देश नेहरु आणि गांधी परिवाराने तयार केलेल्या सिस्टममुळे आहे. असं वक्तव्य केलं होतं. या संदर्भात NDTV ने ट्वीट करत वृत्त दिलं होतं. या ट्वीट वर भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी नेहरु गांधी परिवाराची स्तुती करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर टीका करताना
हे चुकून छापलं गेलंय का?
खरंच त्यांनी असं म्हटलंय का?
असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
यावर एका गौरव जैन नावाच्या व्यक्तीने त्यांना उत्तर देताना...
मोदींनी देशाला इतक्या उंचीवर नेलं की ऑक्सिजन कमी पडू लागला...
तर नायक हसन या व्यक्तीने
भारत गांधी नेहरू परिवाराने तयार केलेल्या सिस्टममुळे पुढे जातो आहे किंवा जात नसेलही मात्र, मोदी आणि शाहमुळं मरत नक्कीच आहे.
नितेश शर्मा म्हणतात...
'सत्य कटू असतं, लस कॉंग्रेस ने तयार केलेल्या संस्थामध्ये बनत आहे. ऑक्सिजन कॉंग्रेस तयार केलेल्या नवरत्न कंपन्यांमध्ये तयार होतो आहे. लोकांवर उपचार कॉंग्रेसने तयार केलेल्या रुग्णालयात होत आहेत. भाजप आणि मोदी यांनी तयार केलेली कॉंग्रेस नेत्याची जगातील सर्वात मोठी मुर्ती काम नाही आली.
तर काही लोकांनी पात्रा यांचं समर्थन केलं आहे.
'आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही केले ते पुढची पीढी बर्बाद करायला निघाली आहे.
असं म्हणत पात्रा यांचं समर्थन केलं आहे.