सचिन वाझे यांना अखेर अटक :नऊ तास चौकशीनंतर NIA ची कारवाई
नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या आधिवेशनात वादग्रस्त ठरलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना मध्यरात्री (ता.१४) अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेशन संस्था (NIA) ने सांगितलं आहे.;
नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात सचिन वाझेंचा मुद्दा गाजला होता. २५ फेब्रुवारी ला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अंटालिया घराबाहेर स्फोटकं भरलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिराणी यांचा मृत्यू यावरुन आधिवेशन गाजलं होतं. विधीमंडळात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वाझेंचे सीडीआर सादर करत त्यांच्या निलंबन आणि बडतर्फीची मागणी केली होती.
परंतू गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली केली. एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता.
या गोंधळामुळे काल 9 मार्च विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.
त्यानंतर एनआयए ने चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली आहे.