Sachin Vaze Case: ठाकरे सरकार माफियांची टोळी: किरिट सोमैया

Sachin Vaze Case: ठाकरे सरकार माफियांची टोळी: किरिट सोमैया;

Update: 2021-03-14 06:01 GMT

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटक प्रकरणाने आता नवीन वळण घेतलं आहे. 25 फेब्रुवारीला अंबानीच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. मात्र, ज्या मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळला होता. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

तसंच हिरेन यांच्या पत्नीने देखील सचिन वाझे यांनी त्यांच्या पतीचा खून केला असा आरोप केला होता. त्यानंतर एनआयए ने सचिन वाझेला अटक केली आहे. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापलं आहे.

भाजप नेते किरीट सोमैया यांनी या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे प्रकरणातील आणखी काही लोक जेलमध्ये जाणार असल्याचा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबई चे पोलिस आयुक्त परमबीर सिंह वाझे बरोबर तीन दिवस काय गुप्तगू करत होते? असा सवाल किरिट सोमैया यांनी केला असून ठाकरे सरकार ही माफीयांची टोळी झाली असल्याचा आरोप केला आहे.


काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता.

या गोंधळामुळे काल 9 मार्च विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.

त्यानंतर एनआयए ने चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली आहे.

Tags:    

Similar News