देशात करोना महामारीला रोखण्यासाठी मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत 18 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाने संयुक्त पत्रकार परिषद घेत देशातील लसीकरणा संदर्भात माहिती दिली.
यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपर्यंत देशात 200 कोटी लशींचे डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
देशात रशियाच्या स्पुतनिक लसीला परवानगी देण्यात आलेली आहे. ही लस भारतात दाखल झाली असून पुढच्या आठवड्यात ती बाजारपेठेत उपलब्ध होईल. तसेच ऑक्टोबर पासून रशियातील कंपनी भारतात स्पुतनिक लसीचे (Sputnik V) उत्पादन सुरु करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर देशात डिसेंबर पर्यंत 8 कंपन्यांच्या सुमारे 216 कोटी लशी उपलब्ध होतील. असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.