रस्ता बनवण्याचा अल्टिमेटम तोडला, बीड मनसेने नगरपालिका फोडली

Update: 2023-08-11 07:32 GMT

बीड शहरातील अमरनाथ स्मशानभूमी ते सह्याद्री हॉस्पिटल शिवशारदा बिल्डिंग जालना रोडवर पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यासंदर्भात प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली.


 Full View



महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यांनी दिलेला अल्टिमेटम पाळला नसल्याच्या रागातून मनसे कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयाची तोडफोड केली आहे. यासंदर्भात आम्ही बीड नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निता अंधारे यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर रस्त्याचे काम सुवर्णजयंती नागरोत्थान योजनेतून प्रस्तावित असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर निविदा प्रक्रिया राबऊन काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tags:    

Similar News