रेखा जरे हत्याकांड: अखेर बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात सापडला

बाळ बोठे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कुठं सापडला बाळ बोठे?;

Update: 2021-03-13 03:48 GMT

अहमदनगर जिल्ह्यातील रेखा जरे यांच्या हत्याप्रकरण अखेर पत्रकार बाळ बोठे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळ बोठे यांच्यावर रेखा जरे यांच्या हत्येचा आरोप आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने बोठे यांना हैद्राबाद येथून अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

३० नाहेंबर 2020 ला अहमदनगर मधील नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यात जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात बाळ बोठे यांनी रेखा जरे यांना मारण्यासाठी पैसे पुरवल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पोलिस 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

Tags:    

Similar News