मुंबईत रेड अलर्ट, शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी | Red Alert in Mumbai
भारतीय हवामान खात्यानं मुंबई महानगराला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं उद्या सर्व शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलीय.;
भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत मुंबई महानगरात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या इशाऱ्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सर्व खासगी तसेच सरकारी शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे