मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, रविवारी 11 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून रविवारी राज्यात 11 हजार 877 रुग्णांची तर मुंबईत ८,०६३ नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे.;
रविवारी दोन हजार 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापार्यंत 65 लाख 12 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज 11 हजार 877 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णांचा कमृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९२,५९,६१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,९९,८६८ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४३,२५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४२,०२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ११,८७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,९९,८६८ झाली आहे.
राज्यात आज 50 ओमायक्रॉनचे रुग्ण -
आज राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
मुंबई देखील पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे. कारण मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६८९ वाढली आहे म्हणजेच आज ८ हजार ६३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल, शनिवारी मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. ही संख्या आज दीड हजारांहून वाढली आहे. तसेच आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसून ५७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आज ६० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७९वर पोहोचली आहे. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९९ हजार ५२० झाली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३३७ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५० हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २९ हजार ८१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.