भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात, इंदापूर ते कागल कोण लढणार कुणाच्या विरोधात ?
कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे भाजप नेते समरजित घाटगे यांची बंडखोरी शरद पवार यांच्या पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. तर इंदापूरचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये उमेदवारी मिळणार नसल्यामुळे बंडाचे निशाण फडकवले आहे.भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात का झाली? विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी इतर पक्षात सुद्धा बंडखोरीची लागण लागण्याची किती शक्यता आहे. विश्लेषण केले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.