वाचन आणि साहित्य संस्कृती टिकली पाहिजे - अजित पवार

Update: 2024-02-02 12:35 GMT

हल्ली पुस्तकांऐवजी संगणक आणि मोबाईल स्क्रीनवरून वाचनाची संख्या वाढलेली आहे आपली ग्रंथ नियतकालिके पुस्तकावर्तमानपत्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहेत. डिजिटल क्रांती घडली असली तरी वाचन संस्कृती साहित्य संस्कृती टिकली पाहिजे कारण ही समाजाची गरज आहे. सुशिक्षित आणि प्रतिभावान समाजाच्या निर्मितीसाठी हे आवश्यक असल्याचा मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमळनेर येथील 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

आज पासून 97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून पुस्तकांनी आणि साहित्यिकांनी अमळनेर नगरी सजली आहे . हे संमेलन आज पासून चार तारखेपर्यंत असणार आहे.


 



आपल्या उद्घाटनपर भाषणात पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की

अमळनेर ही पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे,कवयित्री बहिणाबाईंचा जिल्हा, ना.धो.महानोर यांचा जिल्हा,उद्योगपती अजिम प्रेमजी यांनी आपल्या व्यवसायाचे रोपटं याच अमळनेर मध्ये लावलं.अमळनेरआणि खानदेशाची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

अजित पवार यांनी साहित्यकांच्या समाजासाठी आणि संकृतीसाठीसाठी असणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांची प्रशंसा केली साहित्यिक समाजाच्या दर्पण असतात ते समाजाला प्रेरणा देतात आणि मार्गदर्शन देतात त्यामुळे साहित्यिकांनी आणि पत्रकारांनी लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे असं आवाहन त्यांनी साहित्यिकांना केले.




 

तसेच मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान अजित पवार यांनी केले.

मराठी भाषेतील साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न गरजेचा आहे असेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी आळमनेर शहरात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

Tags:    

Similar News