HDFC बँकेला नवीन डिजिटल सेवा आणि क्रेडीट कार्ड ग्राहक जोडण्यास बंदी
HDFC बँकेवर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध घातले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे ते पाहूया....;
वित्तक्षेत्रातील दिग्गज बँक हदफक ला रिझर्व्ह बँकेने नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि नवीन क्रेडीट कार्ड ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. गेल्या काही काळात बँकेच्या डिजिटल सेवा, मोबाईल बँकींमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत असल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. HDFC बँकेने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार २ डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशाच म्हटले आहे की, बँकेच्या इंटरनेंट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट युटिलिटमध्ये सातत्याने अडथळे येत आहेत.
गेल्या २ वर्षांपासून या अडचणी येत आहेत. २१ नोव्हेंबर रोजी बँकेच्या इंटरनेट बँकिंह आणि पेमेंट यंत्रणेमध्ये बराच गोंधळही झाला होता. पण प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज नसल्याने हा गोंधळ झाला होता, असे बँकेने स्पष्ट केले आहे. HDFC बँकेने आपल्या २.0 या महत्त्वाकांक्षी योजनेत नवीन डिजिटल चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे बँकेला मोठा झटका बसला आहे. यामध्ये बँकेच्या व्यवसाय निर्मिती कऱणाऱ्या IT एप्लिकेशनवरही बंदीचे आदेश देण्य़ात आले आहेत.
HDFCच्या संचालक मंडळाने वारंवार होणाऱ्या या गोंधळाची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. जोपर्यंत बँकेतर्फे यावर समाधानकारक तोडगा काढला जात नाही तोपर्यंत RBIचे निर्बंध कायम राहणार आहेत, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान HDFC बँकेने यावर स्पष्टीकरण दिले आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अडचणींवर मात करण्यासाठी आमच्यातर्फे काही महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. तसेच सर्व नियमांचे पालन केले जात आहे. बँक अत्यंत सावधपणे सर्व अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ग्राहकांना याचा कोणताही त्रास होणार नाही, असंही बँकेने म्हटले आहे.