सदाभाऊ खोतांची राज्यपालांकडे अजब मागणी
महाविकास आघाडीचा राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव प्रलंबित असताना आज रयत क्रांती संघटनेचे शिष्टमंडळाने सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल भगतसिंग कोशारींची भेट घेऊन १२ नावं सादर केली आहेत.
राज्यात लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांना वाढीव रकमेची बिले देण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 मार्चपासुन लाॅकडाऊन सुरू करण्यात आले व लगडून मुळे व्यापारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल 300 युनिटचे देण्यात आले देण्यात आले. तरी वाढीव वीज बिल तात्काळ माफ करणे बाबत शासनाचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अतिवृष्टी गारपीट नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासुन पावसाने जोरदार हजेरी लावली शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नुकसानीमुळे शेतीसाठी झालेला खर्च वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे व राज्यातील शेतकऱ्यांची चालू पीक कर्ज माफ करून आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी विनंती मा. सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल महोदयांकडे केली.
तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकाचे राज्यात तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता राज्य सरकारला सूचना देणेबाबत देखील विनंती केली. तसेच महात्मा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्यात यावी, अशी विनंती केली.
तसेच कोरोनाच्या या महाभयंकर काळामध्ये जे आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, खाजगी डॉक्टर, तसेच राज्यभरातील अनेक पत्रकार कोरोनामुळे मृत्यु पावले अशा व्यक्तिंना शासनाकडून 50 लाख रुपये देणेबाबत शासनाने सांगितले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. तरी याबाबत देखील आपण सूचना कराव्यात अशी विनंती करण्यात आली.
आमदार नियुक्तीसाठी राज्यपाल महोदयांना सुचवली 12 लोकांची यादी महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आमदारकीच्या 12 जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. राज्यांमध्ये अनेक नामवंत आहेत की ज्यांना आजपर्यंत कुठे संधी मिळालेले नाही. अश्या व्यक्तिंचे गेले अनेक वर्ष आपआपल्या क्षेत्रात काम सुरू आहे. तरी अशाच काही वैशिष्टपुर्ण व्यक्तिंची नावे मा. राज्यपाल महोदयांना आ. सदाभाऊ खोत यांनी सादर केली.
🖊️नावे व कार्यक्षेत्र 🖊️
1) श्री. मकरंद अनासपुरे
(कला फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य )
2) श्री. विठ्ठल वाघ
(लेखन व साहित्यिक)
3) श्री विश्वास पाटील
(लेखन व साहित्यिक)
4) श्री जाहीरखान
(क्रीडा)
5) श्रीमती मंगलाताई बनसोडे
( कला )
6) श्री अमर हबीब
(सामाजिक कार्य व पत्रकार)
7) श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर
( सामाजिक कार्य व प्रबोधन)
8) श्री पोपटराव पवार
(सामाजिक कार्य)
9) श्री डॉ. तात्याराव लहाने
( सामाजिक कार्य व आरोग्य सेवा)
10) श्री डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक कार्य)
11) श्री सत्यपाल महाराज
(सामाजिक कार्य व प्रबोधन)
12) श्री बुधाजीराव मुळीक
(विज्ञान व शेती विषयाचे गाढे अभ्यासक)