Mumbai - जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते (Shivsenaubt ) रवींद्र वायकर (Ravindra Waikar ) यांची ईडी चौकशी तब्बल ९ तास सुरू होती. चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून(ED) वायकरांना तीन वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु आरोग्याच्या कारणास्तव वायकर हे सुरुवातीला ईडी चौकशीला हजर राहिले नाही. परंतु तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर वायकरांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. ईडी चौकशी राजकीय दबावामुळे सुरु असल्याचा आरोप केला आमदार रवींद्र वायकर यांनी केला आहे
ईडी चौकशी राजकीय दबावातून सुरू असल्याचा आरोप
यावेळी वायकरांनी म्हणाले, "ईडीने मला घरी जाऊन चौकशीसाठी बोलावले. तेव्हा त्यांनी माझ्याकडे 19 वर्षांची कागदपत्रे मागितली. पण इतक्या वर्षांची कागदपत्रे सादर करण्यासाठी मी वेळ मागितला होता. माझी तब्येत बरी नव्हती, हा वेगळा मुद्दा असला तरीही मला वेळ वाढवून देण्यात आला नाही." वायकरांनी या प्रकरणातील आपला हिशोबही मांडला. ते म्हणाले, "आम्हाला गेल्या 19 वर्षात फक्त 32 ते 36 कोटींचा फायदा झालाय. त्यातले 20 कोटी कामगारांचे पगार देण्यावर खर्च झालेत. त्यामुळे आम्हाला 11 कोटी मिळाले. आम्ही पाच जण होतो. त्यामध्ये प्रत्येकाला 1 कोटी 22 लाखांचा फायदा झाला. बाकीचे जे 5 कोटी आहेत, पंजाब-महाराष्ट्र बँकेत आहेत."
दरम्यान वायकर पुढे म्हणाले, "मी जे क्लब बांधलं होतं, त्याला ओसी वैगरे सगळं होतं. तरीही मुंबई महापालिकेच्या माध्यमातून माझ्यावर बांधकामाची तक्रार करण्यात आली. नवीन डीसीआर आल्यानंतर त्याच्या माध्यमातून दोन वर्ष बांधकामाचं काम झालं. पण राजकीय दबावातून आणि आयुक्तांच्या माध्यमातून ते बांधकाम बंद करण्याची नोटीस देण्यात आली."
500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा किरीट सोमय्या दावा
रवींद्र वायकर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.