राणा दाम्पत्याला पुन्हा कोरोनाचा विसर; मेळघाटात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची विना मास्क क्रिकेट मॅच
आज होळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो आहे. यात अमरावती च्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवा सोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेले असून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या 11 वर्षापासून ची परंपरा जोपासली आहे.
आज मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून खासदार नवनीत राणा यांनी मनसोक्त आनंद लुटला. मात्र यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना नियम धाब्यावर बसवून ठेवले होते. दोघांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते तर सोशल डिस्टनचे यावेळी तीन तेरा वाजले होते. यावेळी नवनीत राणा यांच्या चेंडूवर आमदार रवी राणा यांनी बॅटींग केली तर नवनीत राणा यांनी सुद्धा क्रिकेट पीज जोरदार बॅटींग केली. राणा दाम्पत्याने यावेळी तुफान बॅटींग करत क्रिकेटचा आनंद लुटला.
जिल्हात कोरोनाचा उद्रेक सुरू असतांना राणा दाम्पत्याने सोशल डिस्टनचे पार तीनतेरा बाजवले दोघांच्या तोंडाला मास्क नव्हता त्यामुळे कोरोना नियम या राना दाम्पत्याने पुन्हा धाब्यावर बसवले असल्याने कोरोना नियम सर्वसामान्य माणसालाच का? हा प्रश्न पुन्हा यावेळी उपस्थित होत आहे.
दरम्यान एकीकडे अमरावती जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे परंतु मेळघाटमध्ये कोरोनाचा पादुर्भाव अल्प आहे. अशा परिस्थितीत आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्या सोबत गेलेले कार्यकर्ते हे सर्व विना मास्क फिरत आहे त्यामुळे मेळघाटात कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर कोरोना वाढला तर आरोग्य यंत्रणाही मेळघाटात सक्षम नाही आहे त्यामुळे आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.