Ramdas Athvale offer to Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात यावे, रामदास आठवले यांची ऑफर
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पण नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी वाचा.....;
अजित पवार (Ajit pawar) यांनी आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असतानाच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसींना संधी द्यावी, असं वक्तव्य केलं. पक्षातील महत्वाची पदं एका समाजाच्या सदस्यांकडे असतील तर इतर समाजांना दुसरी पदं द्यायला हवीत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह अनेकजण ओबीसी आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी द्यावी, असं मत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले होते.
तसेच आपल्यालाही संधी दिली तर आपणही प्रदेशाध्यक्ष पद सांभाळू, असंही छगन भूजबळ म्हणाले होते. त्यासंदर्भात रामदास आठवले (Ramdas Athvale offer to Chhagan Bhujbal) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीत फक्त मराठा (Maratha) समाजालाच जास्त पदं दिले जात आहेत ही रास्त भूमिका आहे. कारण छगन भुजबळ हे शरद पवार (Sharad pawar) यांच्यामागे ताकदीने उभे राहिले आहेत. त्यांना जर वाटत असेल की आपल्यावर राष्ट्रवादीत अन्याय होतोय तर त्यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे, अशी ऑफर रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना दिली आहे.