आमच्या नात्यात कोणीतरी विष कालवतय ; राज ठाकरे भावुक

'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रमात पहिल्याच आठवड्यात कोण पाऊणे असणारा याची एक झलक दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्र नवर्निर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमात येणार असल्याचे पहायला मिळते आहे.;

Update: 2023-05-24 12:20 GMT

जून महिन्यापासून प्रत्येक रविवारी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खुपणार तिथे टोचणार' असे म्हणत झी मराठीवर लोकप्रिय कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडचे मानकरी हे राज ठाकरे असणारा आहेत.

अवधूतचे खुपणरे प्रश्न आणि फायर ब्रँड राज ठाकरे यांचे बेधडक उत्तर यावेळी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. नेहमीच कडक, रुबाबदार बोलणारे राज ठाकरे यांची हळवी बाजू हि या कार्यक्रमात दिसणार आहे. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बालपण हे एकत्र गेले.

त्यांनी बाळासाहेबांसोबत राजकारणाचे धडेही एकत्रच गिरवले आहे. अनेकदा परंतु प्रत्यक्ष राजकारणाच्या पटलावर त्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे. यातच शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे हे विरोधात स्टेटमेंट देत असल्याचेही आपण पाहिले असाल. पण राजकारणाव्यतिरिक्त दोन्ही भावांचे सलोख्याचे संबंध वेळोवेळी पाहायला मिळाले आहेत. अनेकदा ते अडचणीच्या काळात आणि संमारंभात एकत्र आलेले पाहायला मिळते. त्यांची हि बाजू उलघडण्याचा प्रयत्न 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातून होणार आहे

. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये राज ठाकरे यांना बोलावण्यात आलं आहे. यावेळी अवधूत गुपते यांनी उद्धव, बाळासाहेब, आणि राज यांचा एकत्र फोटो दाखवत "कस वाटतय हे सगळं बघून" असा प्रश्न विचारला असता त्यावर राज ठाकरे भावुक होत म्हणाले "खुप छान दिवस होते ते. माहित नाही मला, कोणीतरी विष कालवल आमच्या नात्यात" अशा पद्धतीचे उत्तर राज ठाकरे यांनी दिल. त्यामुळे आगामी काळात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उधान आलाय.

Tags:    

Similar News