राज ठाकरेंच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लासमध्ये काय? सोशल मीडियावर चर्चा

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे आशिर्वाद घेत असल्याचा फोटो शेअर केला. मात्र त्या फोटोत असलेल्या ग्लासची जोरदार चर्चा रंगली आहे.;

Update: 2022-03-27 03:40 GMT

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आज वाढदिवस होता. आज वाढदिवस म्हटल्यानंतर सहाजिकच संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. आणि राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेत असतानाचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. संदीप देशपांडे यांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली. आता तुम्ही म्हणाल आशीर्वाद घेताना चे फोटो शेअर केल्यानंतर त्यात चर्चा करण्यासारखं काय? संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला म्हणून समाज माध्यमांवर ही चर्चा रंगलेली नाही ही चर्चा रंगली आहे या फोटोमध्ये दिसणार्‍या एका ग्लास मुळे.



संदीप देशपांडे यांनी जो फोटो शेअर केला आहे त्या फोटो मध्ये ते राज ठाकरे यांना वाकून पाया पडत आहेत. आणि यावेळी याठिकाणी कडेला असलेल्या एका टेबलवर एक ग्लास आहे. आता या ग्लास मध्ये नक्की काय आहे हे कोणास ठाऊक, हा ग्लास नक्की कोणाचा आहे हे देखील माहीत नाही. मात्र त्या ग्लास वरून समाज माध्यमांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. संदीप देशपांडे यांच्या या ट्विट वरती अनेकांनी रिट्विट करत या ग्लासचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आता लोकांनी या फोटो वरती काय-काय कमेंट केल्या आहेत ते आपण पाहूयात..

हर्षवर्धन पाटील या एका ट्विटर वापरकर्त्याने या संदीप देशपांडे व राज ठाकरे यांचा फोटो आणि त्या फोटोमध्ये दिसणारा ग्लासला हायलाईट करत "जे फक्त उद्धव ठाकरे यांची बदनामी, ट्रोल, विरोध करण्यासाठी फक्त येतात त्यांच्यासाठी" असं म्हणत त्यांनी हा फोटो खाली शेअर केला आहे.



नम्रता ukey शांभरकर या एका ट्विटर वापरकर्त्याने "देशी+ पांड्यासाठी आज विदेशी ! हॅप्पी बर्थडे" असं म्हणत संदीप देशपांडे आणि राज ठाकरे यांचा फोटो ेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी देखील कडेला टेबलवर दिसणार्‍या क्लासला हायलाईट केलं आहे.



वैभव काठोले या ट्विटर वापरकर्त्याने वरती नम्रता ukey शांभरकर यांनी जो फोटो शेअर केला आहे त्याला रिप्लाय देत बाळासाहेब ठाकरे आणि एका व्यक्तीचा मद्यपान करत असलेला फोटो शेअर केलेला आहे.



योगेश सावंत यांनीदेखील या दोघांचा फोटो शेअर करत "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं लिहिलं आहे आणि या शेअर केलेल्या फोटोमध्ये टेबल वर असलेला ग्लासला हायलाईट केला आहे.



शिल्पा बोडके यांनी ब्लॅक टी..??? असं म्हणत राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा हा फोटो व टेबल वरील ग्लासला हायलाईट करून शेअर केला आहे.



अभिजीत नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने "आता जळणारे म्हणतील कोपर्‍यात टेबलवर ठेवलेल्या ग्लासात दारु आहे." असं म्हणत संदीप देशपांडे यांचं ट्विट रिट्विट केला आहे.



अशा प्रकारे समाज माध्यमांवर साध्या राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या फोटोमध्ये दिसणार्‍या त्या ग्लासची चर्चा जोरात सुरू आहे. तर 

Tags:    

Similar News