राहुल गांधी यांनी तळले सोलापुरी आंध्र भजी

राहुल गांधी भारत जोडो यात्रेत अनेक नागरिकांना भेटतात. त्यांचा हात हातात घेऊन चालतात. याबरोबरच विविध संस्कृतीशी एकरुप होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापार्श्वभुमीवर राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान सोलापुरी आंध्र भजी तळण्याचा आनंद लुटला.;

Update: 2022-11-21 06:10 GMT
राहुल गांधी सोलापुरी भजी तळताना

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेत राहुल गांधी अनेक लोकांना भेटले. युवकांशी, वृध्दांशी, दिव्यांगाशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. अनेकांची गळाभेट घेतली. त्यामुळे राहुल गांधी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात असताना सोलापुरी भजी तळण्याचा आनंद लुटला.




भारत जोडो यात्रेची जबाबदारी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यापार्श्वभुमीवर १७ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापुर, पातूर, वडेगाव, धानेगाव येथे भारत जोड़ो पदयात्रा होती. या दिवशी राहुल गांधी आणि काँग्रेस नेतेमंडळी यांच्या दुपारच्या जेवनाच्या मेजवानीचा बेत आमदार प्रणिती शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर ते बाळापुर मार्गावरील गजानन रोपवाटिका येथे केला होता.


 



यावेळी बहुभाषिक सोलापुरचे काही खाद्यपदार्थ बनवण्यात आले होते. त्यामध्ये हिरवी मिरची चिरून त्यात चिंच आणि इतर पदार्थ भरून केलेले आंध्र भजी, धपाटे, दही, शेंगदाने चटणी, ज्वारीची आणि बाजरीची भाकरी, गव्हाची हुग्गी असे पदार्थ बनवले होते. यावेळी राहुल गांधी यांनी स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. त्याबरोबरच राहुल गांधी यांना भजी तळण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे इतर नेतेमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी राहुल गांधी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे कौतूक केले.




 

Tags:    

Similar News