मनसे ( mns)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackrey) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हिंदुत्वासंबंधी आक्रमक भूमिका मांडली.मशिदीवरील भोंगे या सरकारला उतरावावेच लागतील,नाहीतर आम्ही मशिदींमसमोर हनुमान चालिसा मोठ्या आवाजात लावू असा इशारा दिला.या विधानावरुन मनसेमध्येच दुफळी असल्याचं चित्र दिसत आहे.
राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता.मनसे शहराध्याक्ष वसंत मोरे (vasant more) यांनी आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार नाही अशी भूमिका घेतली आहे.आता कोंढवा येथे राज यांनी उद्घाटन केलेल्या एका कब्रस्तानमधील शिलेवरील त्यांचं नाव काढून टाकण्यात आलंय
कोंढवा (kondwa) येथील नुराणी कब्रस्तानमदील सुविधांचे लोकार्पण २०१३ साली मनसे अध्यक्षांच्या हस्ते झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजी पसरली आहे. राज यांनी आपल्या भाषणामध्ये मशिदींबरोबर अजान आणि मुस्लीम समजाचा अपमान केल्याचा दावा करत अज्ञातांनी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज यांच्या नावाला काळं फासलं आहे.
दरम्यान, या गुढीपाडव्याच्या सभेनंतर निर्माण झालेले प्रश्न आणि टीकेला राज ठाकरे ९ एप्रिल रोजी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये उत्तर देणार असल्याचं मनसेचे नेते (sandip deshpande)संदीप देशपांडे आणि (avinash jadhav) अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय.